Sanjay Raut: देशात न्यायाचं राज्य राहील याची जबाबदारी आता नवनिर्वाचित राष्ट्रपतींची: संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut: देशात न्यायाचं राज्य राहील याची जबाबदारी आता नवनिर्वाचित राष्ट्रपतींची: संजय राऊत

पुढारी ऑनलाईन:  भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीत शिवसेनेचा देखील खारीचा वाटा आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. मुर्मू या देशाच्या संविधानाच्या रखवालदार आहे. त्या घटनात्मक प्रमुख आहेत. त्यामुळे या देशात घटनेची पायमल्ली होणार नाही. न्यायाचं राज्य राहील याची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे. जेव्हा जेव्हा घटनेवर हल्ले होतील तेव्हा या देशाचा नागरिक त्यांच्याकडे आशेने पाहिल. त्यामुळे याची त्यांनी काळजी घ्यावी, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

सध्या आदित्य ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांच्या शिवसंवाद यात्रेची ठाण्यातून सुरूवात झाली. यावेळी आदित्य यांना तरूण आणि शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यानंतर लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील राज्याचा दौरा करतील, त्याची तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील वातावरण तुम्हाला शिवसेनामय झालेले दिसेल, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

 

Back to top button