शिवसेनेला धक्का! आमदार गणेश नाईक समर्थक तीन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेला धक्का! आमदार गणेश नाईक समर्थक तीन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
Published on
Updated on

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : दिघ्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवते, दिपा गवते आणि अर्पणा गवते यांनी घरवापसी केली. भाजपचे नेते व आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आज (दि.१९) सकाळी कोपरखैरणे येथील क्रिस्टल हाऊस येथे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दिघा विभागात वर्चस्व असलेले नवीन गवते हे आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक होते. नाईक यांनी नवीन गवते यांना नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापती केले होते. मात्र, गेल्या वर्षी माजी नगरसेवक नवीन गवते, दिपा गवते आणि अर्पणा गवते यांनी नाईकांची फारकत घेतली होती. शिवसेना नेते व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता.
मात्र, राजकारणात कुणीच कोणाचा नसतो. हे राजकीय उलथापालथी आणि राजकीय घडामोडीवरून दिसून येत आहे. शिंदे गटाने भाजपशी युती केल्याने आता शिवसेनेत गेलेल्या नाईक समर्थकांनी पुन्हा भाजपकडे आपला मोर्चा वळवला आहे.

आज युती सरकार स्थापन झाल्यानंतर नवी मुंबईत शिवसेनेला गवतेचा पक्षप्रवेश म्हणजेच गळती लागल्याची पहिली घटना आहे. युती झाल्याने आता घाबरण्याचे काम नाही. असा निरोप शिवसेनेत गेलेल्या नाईक समर्थकांना पाठवल्याचे समजते. त्यानंतर भाजपमधील हा पक्षप्रवेश सुरू झाला आहे. गवते हे सुरूवातीपासून आमदार नाईक यांचे समर्थक होते. त्यांचे दिघा विभागात वर्चस्व आहे. एकाच कुटुंबातील तीन माजी नगरसेवक असल्याने राजकीय वजन ही गवतेंचे तेवढेच आहे. गवतेच्या भाजप पक्षप्रवेशामुळे शिवसेना गटात खळबळ उडाली आहे. भाजप नेते व आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक नवीन गवते, दिपा गवते आणि अर्पणा गवते यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news