गोरेगाव : पर्यावरणप्रेमींकडून आरे मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन | पुढारी

गोरेगाव : पर्यावरणप्रेमींकडून आरे मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन

गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा: आरे मेट्रो कारशेड विरोधात पर्यावरणप्रेमींकडून आरे पिकनिक पॉइंट येथे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा तिसरा रविवार (दि.१७ )आहे. यावेळी आंदोलनात सहभागी पर्यावरणप्रेमी आंदोलकांकडून शिंदे- फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषाबाजी करत या प्रकल्पाला विरोध केला.

सरकारच्या दडपशाहीविरोधात हे आंदोलन असून, कोणत्याही परिस्थितीत आरे जंगल वाचवण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे पर्यावरण प्रेमींकडून सांगण्यात येत आहे. आजच्या या आंदोलनात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यादेखील ‘आरे जंगल वाचवा’ मोहिमेसाठी मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. विद्या चव्हाण यांनी आरे मेट्रो कारशेडल प्रकल्पाला विरोध करत, प्रकल्प लवकरात लवकर स्थलांतर करण्याची मागणी यावेळी केली.

‘मेट्रो ३’ कारशेडसाठी वृक्ष हटवण्यास वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने कारशेडच्या जागेसाठी २,६४८ वृक्ष हटवण्याची परवानगी दिल्यानंतर ‘आरे वाचवा’ मोहीम अधिक तीव्र झाली. यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आरे जंगल वाचवा या अभियाना अंतर्गत निदर्शने सुरू आहेत. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमी सहभागी होताना दिसत आहेत.

व्हिडिओ पाहा:

Back to top button