

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. आतापर्यंत लेना बँक बघितली. परंतु एकनाथ शिंदे म्हणजे देना बँक आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. रविंद्र नाट्यमंदिरात औरंगाबादमधील आमदारांच्या सत्कार सोहळ्याचे आज (दि.१५) आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, मंत्रिपदाच्या कार्यकाळात जे शक्य झाले नाही, ते आता शक्य झाले आहे. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण आमचे नेते होते. परंतु त्यांच्यापेक्षा दहा पटीने मदत करणारा नेता आम्हाला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मिळाला आहे.
हेही वाचलंत का ?