Devika Rotawan: दहशतवादी माणसे मारतील, पण माणुसकी संपवू शकणार नाहीत; देविका रोटावनचा संदेश

२६/११ मुंबई हल्ल्यातून बचावलेल्या देविकाने ग्लोबल पीस अवॉर्ड सोहळ्यात शाहरुख खान यांच्याशी संवाद साधताना सांगितली त्या रात्रीची कहाणी.
Devika Rotawan
Devika RotawanPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: दहशतवादी माणसे मारतील पण माणुसकी संपवू शकणार नाहीत असे उदगार २६ /११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या देविका रोटावन हिने व्यक्त केले.

त्या हल्ल्याच्या वेळी अवघी नऊ वर्षाची असलेली देविका शनिवारी गेट वे ऑफ इंडियावर झालेल्या ग्लोबल पीस अवॉर्ड समारंभात अभिनेते शहारुख खान यांच्याशी संवाद साधत होती.

दहशतवाद्यांनी आम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर गावी जाण्यासाठी ट्रेन पकडत असताना अंदाधुंद गोळीबार केला त्यात मी जखमी झाले. माझ्यावर चार शस्त्रक्रिया झाल्या मी रुग्णालयात होते पण आता मला या क्रूरतेला सामोरे जाण्याचे धैर्य लाभले आहे लहानपणीच मी राक्षस पाहिला त्यांनी क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडत मानवतेवर हल्ला केला असे उद्गार व्यक्त करत तिने त्या दिवशीच्या रात्रीची कहाणीच मांडली. भारत दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही असे टाळ्यांच्या कडकडाटात तिने सांगितले.

Devika Rotawan
Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र; जळगावात राज्यातील नीचांकी ८ अंश तापमान

दिव्यज फाऊंडेशनच्या या समारंभात अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकारातून सदगुरू जग्गी वासुदेव, सचिन तेंडुलकर तसेच गडचिरोलीत उद्योग उभारणारे प्रभाकरन यांना त्यांनी केलेल्या लोकोपयोगी कामाबद्दल गौरवण्यात आले.

महाराष्ट्रासमोर मोठे दुष्काळाचे संकट आले असून त्यातून बाहेर पडण्याचे उपाययोजना करताना मातीचा ओलावा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे बांधणे आणि बंधारे उभारणे हे केवळ तांत्रिक काम असते. मात्र मातीत ओल टिकली पाहिजे असे उद्‌गार सदगुरू जग्गी वासुदेव यांनी काढले.

Devika Rotawan
Maharashtra Anti Conversion Law: बुरख्यातील फोटो म्हणजे धर्मांतराचा पुरावा नाही; मुंबई न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

महाराष्ट्र सरकार दिशा फाउंडेशनची सातत्याने मदत घेत असून जलसंधारणाच्या कामांमध्ये त्यांची मदत घेतली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले यावेळी सदगुरू जग्गी वासुदेव आणि फडणवीस यांच्यातील संवाद कार्यक्रमाचे आकर्षण ठरला.

या कार्यक्रमात रणवीर सिंग शाहरुख खान अमिताभ बच्चन सुखविंदर सिंग तसेच अक्षय कुमार या अभिनेत्यांनी वेगवेगळ्या गाणं आणि नृत्य प्रकाराद्वारे २६/११ तील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

तसेच भारता समोरचे प्रत्येक आव्हान पोलादी मनगटाने परतावले जाईल याची ग्वाही दिली महाराष्ट्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्री, उद्योगपती अंनत अंबानी, संगीता जिंदाल आणि मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्या हस्ते एक पुरस्कारही देण्यात आला. त्यांची हजेरी सहज होती की भविष्यातील काही राजकीय संकेत अशी चर्चा उपस्थितात सुरु झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघीही हजर असल्याने त्यांच्यात काही संवाद झाला का हे मात्र कळू शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.