‘गांधींना मारण्यापेक्षा जीनांवर तो प्रयोग केला असता, तर फाळणी साजरी करायची वेळ आली नसती’ | पुढारी

'गांधींना मारण्यापेक्षा जीनांवर तो प्रयोग केला असता, तर फाळणी साजरी करायची वेळ आली नसती'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : फाळणी स्मृतीदिन साजरा करण्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. गोडसे सारख्यांनी जीनांना संपवले असते, तर देशाचे अखंडत्व नक्कीच टिकले असते असे त्यांनी म्टले आहे. त्यांनी रोखठोक सदरातून फाळणीवरून मोदींना टोला लगावला आहे.

फाळणीचा दिवस विसरू नका, असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे. देशाचे विभाजन म्हणजे अराजकच होते. पाकिस्तान निर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता, तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला आहे.

त्यांनी आपल्या लेखामध्ये म्हटले आहे की, भारताची फाळणी हा एक भयपट होता. फाळणीच्या वेळी दोन्ही देशांच्या सीमेवरील प्रांतांमध्ये झालेल्या अमानुष हिंसेने स्वातंत्र्याचा पहिला दिवस रक्ताने भिजला होता. पंडित नेहरु स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाची जुळवाजुळव करीत बसले होते. सोबत इंदिरा गांधी होत्या. इतक्यात बाजूच्या खोलीतला पह्न वाजला. नेहरु आत गेले. ते फोनवर बोलू लागले, पण समोरून नीट ऐकू येत नव्हते. नेहरू वारंवार समोरच्या व्यक्तीस सांगत होते, ‘पुन्हा सांग! पुन्हा सांग!’ नेहरूंनी पह्न ठेवला व काळवंडलेल्या चेहऱ्याने ते खुर्चीवर येऊन बसले. इंदिराजींनी विचारले, ”काय झाले? कुणाचा फोन होता?”

आज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? फाळणीची वेदना आता कशी शांत होणार? त्यावर उपाय एकच. फाळणी करून तोडलेली भूमी पुन्हा आपल्या देशात सामील केली जाईपर्यंत राष्ट्रभक्त जनतेच्या मनात शांतता लाभणार नाही आणि देशातही शांतता नांदणार नाही. प्रत्येक हिंदूंच्या मनात ही फाळणीची जखम, अंतकरणाच्या खोल कप्प्यात सदैव ठसठसत आहे. हिंदुस्थान पूर्वीप्रमाणे अखंड व्हावा असे प्रत्येकाला वाटत असले, तरी ते शक्य दिसत नाही, पण आशा अमर आहे. पंतप्रधान मोदी यांनी अखंड राष्ट्र करायचेच असेल, तर स्वागतच आहे. पण फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानमधील ११ कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावरही त्यांनी भाष्य करावे.

”लाहोरचा फोन होता.” नेहरूंना सांगताना हुंदका फुटला. ते म्हणाले, ”लाहोरच्या हिंदी वसाहतीमधील पाणी पुरविणाऱ्या सर्व लाइन्स दंगलखोरांनी तोडल्या आहेत. सकाळपासून तेथील लहान मुले, आबालवृद्ध पाण्यासाठी वणवण करीत आहेत. हे काय चाललंय? मी रात्री देशवासीयांना भाषणात काय सांगू? त्यांना कसे तोंड दाखवू?”…

फाळणीचे कोणतेही नियोजन नव्हते. कायदा-सुव्यवस्था, माणुसकी रस्त्यारस्त्यावर मुडद्याप्रमाणे पडली होती. या हिंसाचारात 10 लाख लोक मारले गेले. हजारो महिलांनी आपली इज्जत वाचविण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. तर अनेक घरांत आपल्या बायका-मुली-सुनांना स्वतःच मारले, नराधमांच्या हाती लागून त्या महिलांचे जीवन खराब होऊ नये म्हणून….

हे ही वाचलं का?

Back to top button