नातेवाईक आहात म्‍हणून अल्‍पवयीन मुलीला विनासंमती स्‍पर्श करु शकत नाही : महानगर दंडाधिकारी न्‍यायालयाची स्‍पष्‍टोक्‍ती | पुढारी

नातेवाईक आहात म्‍हणून अल्‍पवयीन मुलीला विनासंमती स्‍पर्श करु शकत नाही : महानगर दंडाधिकारी न्‍यायालयाची स्‍पष्‍टोक्‍ती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
नातेवाईक आहात म्‍हणून अल्‍पवयीन मुलीला तिच्‍या संमतीशिवाय स्‍पर्श करु शकत नाही, , असे स्‍पष्‍ट करत महानगर दंडाधिकारी न्यायालयाने विनयभंग प्रकरणी ४३ वर्षीय व्‍यक्‍तीला एक महिनांचा कारवास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीने नातेवाईक असणार्‍या अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग करत लग्‍नाची मागणी केली होती.

२००९ मध्‍ये अल्‍पवयीन मुलगी शाळा सोडल्‍यानंतर आपल्‍या घरी जात होती. यावेळी तिचा नातेवाईक असणारा तरुणाने तिला अडवले. तिचा हात पकडत तिला लग्‍नाची मागणी घातली. तसेच तिला घरी येण्‍यासही सांगितले होते. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्‍यात भारतीय दंड संहितेमधील कलम ३२३ (दुखापत करणे ), ३५४ (विनयभंग) नुसार गुन्‍हा दाखल झाला होता.

याप्रकरणी महानगर दंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्‍यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्‍यायमूर्तींनी स्‍पष्‍ट केले की, “आरोपी हा अल्‍पवयीन मुलीचा नातेवाईक आहे. मात्र त्‍याने विना संमती मुलीचा अचानक हात पकडला. आरोपीच्‍या या कृत्‍यामुळे अल्‍पवयीन मुलगी अपमानित झाली तसेच तिला आरोपीच्‍या कृत्‍याची लाजही वाटली. आरोपी मुलीचा नातेवाईक आहे
म्‍हणून संमतीशिवाय तिच्‍या शरीराला स्‍पर्श करण्‍याचा अधिकार नाही”.

यावेळी न्‍यायालयाने पुराव्‍या अभावी मुलीला मारहाण केल्‍याच्‍या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्‍तता केली. मात्र विनयभंग प्रकरणी साक्षीदारांचे पुरावे ग्राह्य धरवत आरोपीला दोषी ठरवले. त्‍याला एक महिनांचा कारवास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा : 

 

Back to top button