मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना यंदा २५ हजार बोनस !

मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना यंदा २५ हजार बोनस !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  महापालिका कर्मचाऱ्यांनी यंदा ६५ हजार रुपये दिवाळी बोनस मिळावा, अशी मागणी केली आहे. पण पालिका प्रशासनाने २०२२ च्या तुलनेत जेमतेम दोन ते अडीच हजार रुपये बोनस वाढवून देण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे यंदा पालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये बोनस मिळू शकतो, असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

दिवाळी जवळ येऊ लागल्यामुळे मुंबई महापालिकेत बोनसच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यंदा कर्मचाऱ्यांना २० टक्के म्हणजे ६५ हजार रुपये बोनस देण्याची मागणी कामगार संघटनांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे लक्षात घेता, कर्मचाऱ्यांना वाढीवपूर्ण देण्यास काहीच हरकत नाही. बोनसच्या रकमेतून आयकर व अन्य कर कापण्यात येऊ नये, अशी मागणी मुंबई महानगरपालिका कर्मचारी समन्वय समितीतर्फे करण्यात आली आहे. पण एवढा बोनस देणे शक्य नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news