काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेलाही ‘प्रिंटिंग मिस्टेक’ची लागण | पुढारी

काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेलाही ‘प्रिंटिंग मिस्टेक’ची लागण

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेला वाण नाही पण, गुण लागला या म्हणीप्रमाणे काँग्रेसच्या ‘प्रिंटिंग मिस्टेक’ची लागण झाली. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेनेच्या उपनेते पदावरून हटवल्याचे जाहीर केले होते. मात्र, रविवारी ३ जुलै रोजी शिवसेनेने पत्रक काढून त्यात सुधारणा केली आहे. या पत्रकात ‘दैनिक सामना’मध्ये आलेली बातमी अनवधनाने छापली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेत उपनेते म्हणून कार्यरत आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसकडूनही झालेली प्रिंटिंग मिस्टेक

२००४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यात काँग्रेसने २००० पर्यंतच्या सर्व अनधिकृत झोपड्या अधिकृत करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणून जाहीर करण्यात आले होते. तर जून २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या २ आमदारांची नावे काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडने प्रसिद्ध केली होती, त्यात चंद्रकांत हंडोरे यांचे नाव हंडूरे असे चुकीचे छापले होते. यानंतर निवेदन काढून हे नाव चुकीने छापल्याचे सांगण्यात आले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button