Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा दणका; ६०० कोटींच्या कामाला दिली स्थगिती | पुढारी

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा दणका; ६०० कोटींच्या कामाला दिली स्थगिती

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेत बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसेना आणि त्‍यांच्‍या मित्र पक्षांना धक्‍का देण्यास सुरुवात केली आहे. आरे कॉलनीतील रद्द करण्यात आलेले मेट्रो कार शेड तेथेच होणार असल्याची घोषणा करत शिवसेनेला दणका दिला. यानंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नियोजनाच्या ६०० कोटी कामांना थांबवत माजी मंत्री छगन भूजबळ यांच्यासोबत राष्ट्रवादीला सुद्धा जोरदार दणका दिला आहे.

छगन भूजबळ यांनी कार्यसमितीची बैठक घेऊन नाशिक जिल्ह्यातील नियोजनाच्या कामांना ५६७ कोटीं मंजूर करण्यात आले होते. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी घाईगडबडीत कामांना मजुंरी कशाला असा सवाल नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारात या कामांना ब्रेक लावला आहे. अशा प्रकारे निर्णय घेऊन हा थेट छगन भूजबळ यांच्‍यासह राष्ट्रवादीला दणका दिल्याचे मानले जात आहे.

उपराष्‍ट्रपती निवडणूक : कॅप्टन अमरिंदर सिंग ‘एनडीए’चे उमेदवार

मुख्यमंत्री होताच शिवसेनेला केले टार्गेट (Chief Minister Eknath Shinde)

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच शिवसेनेला धक्का दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती. मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कारशेट हा प्रकल्प आरे कॉलनीतच होणार असे स्पष्ट केले. याद्वारे त्यांनी थेट शिवसेनेलाच पहिला धक्का दिला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची ६०० कोटींच्या कामांना रोखत त्यांना देखील धक्का दिला आहे.

Back to top button