उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल, शिवसैनिकांकडून घोषणाबाजी  | पुढारी

उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल, शिवसैनिकांकडून घोषणाबाजी 

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. त्यांच्या समवेत रश्मी ठाकरे, अनिल देसाई, अनिल परब यांच्यासह बरेच शिवसेना नेतेही उपस्थित आहेत. शिवसेना भवनात शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवसैनिकांकडू  घोषणाबाजी केली जात आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये फुट पडली. महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुका पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेच्या निवडणकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुध्द बंड पुकारले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमयरित्या वळण मिळाले. एक एक करत शिवसेनेचे आमदार शिंदे गटाला मिळाले. दरम्यान, २९ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि या सत्तासंघर्षाला पुर्णविराम मिळाला. काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

आज उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे, अनिल देसाई,  अनिल परब यांच्यासह शिवसेना भवनात दाखल झाले. यावेळी भवनात शिवसैनिकांची एकच गर्दी झाली होती. यावेळी शिवसैनिकांकडूव घोषणाबाजी केली जात होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button