Sanjay Raut : शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरूवात - संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरूवात - संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत भावना व्यक्त केल्या आहेत. संजय राऊत यांनी हे ट्वीट करत म्हटले आहे की, उद्धव ठाकरे अत्यंत नम्रपणे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले. महाराष्ट्राने एक संवेदनशील मुख्यमंत्री गमावला आहे. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरूवात आहे. (Sanjay Raut)

दगाबाजीचा अंत चांगला होत नाही, असे इतिहास सांगतो, असा टोलाही संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे. लाठ्या खाऊ तुरूंगात जाऊ पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ, असेही संजय राऊत या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्रीचा त्याग करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले आहेत. (Sanjay Raut )

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापुर्वी काही महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादचे-संभाजीनगर, उस्मानाबादचे-धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे- दि.बा.पाटील असे नामकरण करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Sanjay Raut )

हेही वाचलतं का?

Back to top button