Eknath Shinde : अजगराच्या विळख्यातून शिवसैनिकांना सोडवण्यासाठी मी लढतोय – एकनाथ शिंदे | पुढारी

Eknath Shinde : अजगराच्या विळख्यातून शिवसैनिकांना सोडवण्यासाठी मी लढतोय - एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंडखोर मंत्र्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत दिला होता. तसेच दिवसभरात बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची आज (दि.२५) शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत याला प्रतिउत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, प्रिय शिवसैनिकांनो महाविकास आघाडीचा खेळ ओळखा, महाविकास आघाडीच्या अजगरासारख्या विळख्यातून शिवसेनेला आणि शिवसैनिकांना मी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच हा लढा मी सर्व शिवसैनिकांसाठी समर्पित करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत सांगितले. (Eknath Shinde)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाचे नाव ‘शिवसेना बाळासाहेब’ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून सहा ठराव मंजूर केले होते. या ठरावांनुसार बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. यानंतर बंडखोर आमदारांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

ईडीच्या कारवाईमुळे आमदारांचे बंड (Eknath Shinde)

केंद्र सरकारने ईडीचा वापर करून कारवाया केल्यामुळे बंड केले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, प्रताप सरनाईक हे काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षातून आलेले नेते आम्हाला काय हिंदूत्व शिकवणार असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. (Eknath Shinde)

हेही वाचलंत का?

Back to top button