राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल, कोल्हापुरात चर्चेचा विषय | पुढारी

राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल, कोल्हापुरात चर्चेचा विषय

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेते राजेश क्षीरसागर ही आता नॉटरिचेबल झाले आहेत.

राजेश क्षीरसागर हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मातोश्रीच्या अत्यंत जवळचे आणि कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे.

शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. याआधी भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, शिवसेना शहरप्रमुख आणि २ वेळा आमदार अशी त्यांची कारकीर्द आहे.

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी राजेश क्षीरसागर यांच्याशी संवाद साधला होता. परंतु, आज (दि. २३) सकाळी एकनाथ शिंदे यांचा राजेश क्षीरसागर यांच्याशी संवाद झाल्याचे समजते. त्यानंतर क्षिरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉटरिचेबल असल्याचे स्पष्ट झाले.

Back to top button