एकनाथ शिंदेंनी मॅजिक फिगर गाठली, शिवसेनेचे ३७ आमदार गळाला, स्वतंत्र गट म्हणून मान्यता? | पुढारी

एकनाथ शिंदेंनी मॅजिक फिगर गाठली, शिवसेनेचे ३७ आमदार गळाला, स्वतंत्र गट म्हणून मान्यता?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्यासाठी शिवसेनेच्या ३७ आमदारांचे आवश्यक असलेले संख्याबळ एकनाथ शिंदे यांनी गाठले आहे. शिवसेनेचे ३७ आणि ९ अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे कोणते पाऊल उचलतात याबाबत उत्सुकता आहे. ते स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले आमदार आपल्यासोबत असून आम्हाला शिवसेनेचा गट म्हणून मान्यता देण्याची मागणी शिंदे करू शकतात.

एकनाथ शिंदे यांच्या तंबूत शिवसेनेचा एक एक आमदार वाढत असताना शिवसेनेला गळती लागली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या शिवसेना आमदारांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीला १७ आमदार उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सोबत नेमके किती आमदार आहेत याची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलवली होती. त्यामध्ये उदय सामंत, कैलास पाटील, नितीन देशमुख, रवींद्र वायकर, अजय चौधरी, सुनील राऊत, राजन साळवी, सुनील प्रभू, वैभव नाईक, संतोष बांगर, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, राहुल पाटील, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर, संजय पोतनीस यांचा समावेश होता.

शिवसेनेनेचे एकूण ५५ आमदार आहेत. त्यापैकी १७ आमदार शिल्लक आहेत. शिंदे यांनी शिवसेनेचे ३७ आमदार गुवाहाटी पोहोचल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांना ३७ आमदार जाऊन मिळाल्याने आता या गटावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार होणारी कारवाई करता येणार नाही. शिंदे आता आपल्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी आजच करू शकतात.

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार

1) एकनाथ शिंदे
2) अनिल बाबर
3) शंभूराजे देसाई
4) महेश शिंदे
5) शहाजी पाटील
6) महेंद्र थोरवे
7) भरतशेठ गोगावले
8) महेंद्र दळवी
9) प्रकाश अबिटकर
10) डॉ. बालाजी किणीकर
11) ज्ञानराज चौगुले
12) प्रा. रमेश बोरनारे
13) तानाजी सावंत
14) संदीपान भुमरे
15) अब्दुल सत्तार नबी
16) प्रकाश सुर्वे
17) बालाजी कल्याणकर
18) संजय शिरसाठ
19) प्रदीप जयस्वाल
20) संजय रायमुलकर
21) संजय गायकवाड
22) विश्वनाथ भोईर
23) शांताराम मोरे
24) श्रीनिवास वनगा
25) किशोरअप्पा पाटील
26) सुहास कांदे
27) चिमणआबा पाटील
28) सौ. लता सोनावणे
29) प्रताप सरनाईक
30) सौ. यामिनी जाधव
31) योगेश कदम
32) गुलाबराव पाटील
33) मंगेश कुडाळकर
34) सदा सरवणकर
35) दीपक केसरकर
36) दादा भुसे
37) संजय राठोड

अपक्ष आमदार

1) बच्चू कडू
2) राजकुमार पटेल
3) राजेंद्र यड्रावकर
4) चंद्रकांत पाटील
5) नरेंद्र भोंडेकर
6) किशोर जोरगेवार
7) सौ. मंजुळा गावित
8) विनोद अग्रवाल
9) सौ. गीता जैन

 पहा व्हिडिओ : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये उपस्थित असलेले शिवसेनेचे ३७ आमदार आणि ९ अपक्ष आमदार.

Back to top button