Virat Kohli Corona Positive : विराट कोहलीला कोरोनाची लागण | पुढारी

Virat Kohli Corona Positive : विराट कोहलीला कोरोनाची लागण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 

टीम इंडियाचा  फिरकीपट्टू रविचंद्रन अश्विन याच्‍या नंतर आता माजी कर्णधार आणि मुख्य फलंदाज विराट कोहलीला कोरोनाची लागण झाली आहे. त्‍याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.आणखी खेळाडूंनाही संसर्ग होण्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे.

पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्‍लंड यांच्‍यात कसोटीत हाेणार आहे.  त्‍याआधी भारतीय संघ २४ जून पासून लीसेस्‍टर काउंटी संघाविरूध्द सराव सामना खेळणार आहेत. दरम्‍यान, अश्विन आणि विराटचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्‍याने या सामन्यावरही त्‍याचा परिणाम होणार आहे.

याआधी भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला कोरोनाची लागण झाली होती. त्‍यामुळे तो लंडनला गेला नाही. विराट कोहलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र सध्या तो बरा असल्‍याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचलंत का? 

Back to top button