राजकीय संकटातच कोरोनाची एंट्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण | पुढारी

राजकीय संकटातच कोरोनाची एंट्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. ठाकरे यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिलीय.

दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. या राजकीय संकटातच कोरोनाची भर पडली आहे.

राज्यपालांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फांउडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्या उपचार सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरु आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२,२४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील रुग्णसंख्या वाढल्याने देशातील सक्रिय रुग्णसंख्या ८१,६८७ वर पोहोचली आहे. कालपासून सक्रिय रुग्णसंख्येत २,३७४ ने वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

Back to top button