महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव : रवी राणा

mla ravi rana
mla ravi rana

पुढारी ऑनलाईन डेस्क : पोलिसांचा वापर करून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी दबाव आणला गेला असता, म्हणून दोन दिवस मुंबईच्या बाहेर होतो, असा आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. आज विधान परिषद निवडणूक मतदानाकरीता विधान भवनात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राज्यसभेच्या पराभवानंतर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. या निवडणुकीच्या मतदानाकरीता आमदार रवी राणा हातात हनुमान चालिसा घेऊन विधान भवनात आले होते. यावेळी ते म्हणाले की, दोन दिवस मुंबई बाहेर होतो. तेथून थेट विधान भवनात आलो आहे. कारण महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी पोलिसांचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात होता. पण जनतेला धोका देणाऱ्या या सरकारला जनताच पायाखाली घेईल. महाविकास आघडीसोबत गठबंधन करून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पायाशी उद्धव ठाकरे गेले आहेत, अशी टीका राणा यांनी यावेळी केली.

हेही वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news