मुंबई : दहावी निकालात भांडुपमधील जुळ्याना ‘जुळी’ टक्केवारी! | पुढारी

मुंबई : दहावी निकालात भांडुपमधील जुळ्याना 'जुळी' टक्केवारी!

भांडुप; पुढारी वृत्तसेवा:  भांडुपच्या जुळ्यांची टक्केवारी ही जुळी आल्याची करामत दहावीच्या निकालात घडली आहे. भांडुपच्या जमिल नगरमध्ये रहाणारे धनाजी ढगे यांना दोन जुळी मुले आहेत. एकाचे नाव सौरव आणि दुसऱ्याचे नाव साहिल असे आहे.सौरव हा साहिल पेक्ष्या एक मिनिटाने मोठा आहे. मात्र, या दोघांनी दहावीच्या निकालात टक्केवारी मात्र जुळीच मिळवली आहे.

भांडुपच्या ऑक्सफर्ड शाळेत शिकणाऱ्या सौरव आणि साहिल या  जुळ्या भावांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयात वेगवेगळे गुण मिळाले असले तरी त्यांचे एकूण गुण आणि त्यांची दोघांची टक्केवारी ८७.२० टक्के अशी आहे. या जुळ्याना मिळालेल्या जुळ्या टक्केवारीने भांडुपकरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button