राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबई भाजप कार्यालयासमोर तृतीयपंथीयांचा मोर्चा | पुढारी

राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबई भाजप कार्यालयासमोर तृतीयपंथीयांचा मोर्चा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयकडून (ED) सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करत शुक्रवारी (दि. १७) तृतीयपंथीयांनी मंत्रालयाजवळील भाजपा प्रदेश कार्यालयासमोर मोर्चा काढला. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या या तृतीयपंथीयांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

तृतीयपंथी प्रथम ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार होते. मात्र, त्यांनी अचानक मोर्चा भाजप प्रदेश कार्यालयाकडे वळविला. मोर्चा कार्यालयासमोर आला तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कार्यालयात उपस्थित होते. अचानक आलेल्या या मोर्चामुळे त्यांची तारांबळ उडाली. पाटील हे भाजप कार्यालयात असल्याचे समजल्यामुळे मोर्चेकऱ्यांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखून धरले. तृतीयपंथीयांनी हे आंदोलन कोणत्या संघटनेने किंवा राजकीय पक्षाच्या सांगण्यावरुन केले हे मात्र कळू शकले नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button