बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज परीक्षेचा निकाल जाहीर | पुढारी

बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या अंतिम वर्षाच्या एप्रिल 2022 मध्ये झालेल्या उन्हाळी सत्राच्या विज्ञान शाखेचा बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज सत्र 6 या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या परीक्षेत 88.50 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीजच्या परीक्षेसाठी 2 हजार 777 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 3 हजार 180 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 138 एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर 42 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होता. या परीक्षेत 121 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

विद्यापीठाने आजपर्यंत 2022 च्या उन्हाळी सत्राचे 45 निकाल जाहीर केले आहेत. विद्यापीठाने विविध परीक्षांचे 3 निकाल मंगळवारी जाहीर केले आहेत. यामध्ये बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज सत्र 6 बरोबरच बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स सत्र 6 (75:25) व बीकॉम इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट सत्र 6 असे तीन निकाल जाहीर केले आहेत. परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/  यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Back to top button