

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देहूत येत आहेत. त्यांची ही देहूला पहिलीच भेट आहे. शिळा मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर मोदींच्या हस्ते येथील स्तंभावर भागवत धर्माची भगवी पताका फडकणार आहे. हा सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत आल्यानंतर वारकरी वेशातील चारशेजण त्यांच्या स्वागतासाठी तयार असतील. तेथून ते मंदिरात प्रवेश करतील.येथील स्तंभाला गजलक्ष्मी वारकरी पताका ध्वजस्तंभ असे नाव दिले आहे. स्तंभाच्या पायथ्यास चार हत्ती व चार फुले आहेत. तेथून 61 फूट उंचीचा ध्वजस्तंभ आहे. खांबाच्या वरील बाजूस बॉल बेरिंग पुली लावली आहे. त्यामुळे वारा कुठल्याही दिशेला असला तरी पताका स्तंभाभोवती गुंडाळली जाणार नाही, असे दिलीप नथू आंबेकर यांनी सांगितले.
देहू येथील शिळा मंदिराजवळ गजलक्ष्मी वारकरी ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजावर भागवत धर्माची पताका फडकाविण्यात येणार आहे.