

नगर : पुढारी वृत्तसेवा
पाईपलाईन रोड परिसरातील रिध्दी-सिध्दी घरफोडी करत चोरट्यांनी 90 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. चोरटे पळताना पाहून कुटुंबाने पाहिल्यानंतर आरडाओरड केला. चोरट्यांनी त्यांना शांत करण्यासाठी दगडफेक केली. त्यात एक जखमी झाला आहे.
कौशिक विश्वास भानुसे (17, रा.रिद्धी सिद्धी कॉलनी, पाईपलाईन रोड, नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात तीन चोरट्यांनी घराचा सेफ्टी दरवाजा कापला. हॉलमधील कपाटातून सोन्याचे दागिने लंपास केले.
40 हजार रुपयांचा नेकलेस, 30 हजाराची चेन, 20 हजाराचे कानातील झुबे असा 90 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे, पोलित निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मुजावर हे करत आहेत.
https://youtu.be/7KwsutS10qQ