फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने बारा लाखांची फसवणूक | पुढारी

फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने बारा लाखांची फसवणूक

पिंपरी : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने एकाची बारा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सन 2019 ते 6 जून 2022 या दरम्यान खराळवाडी, पिंपरी येथे घडला.

याप्रकरणी अफजल दाऊद कुरेशी (36, रा. वैशालीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोहम्मद रफीक अब्दुलगणी दफेदार (वय 57), अल्ताफ अहमद मेहबूब मन्नूर (58, दोघे रा. घोरपडीगाव, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना खराळवाडी, पिंपरी येथील नवाजीश पार्क या बांधकाम साईमध्ये एक फ्लॅट देण्याचे कबूल केले.

केकच्या नव्या प्रकारांची नागरिकांना भुरळ

त्यांच्यात 20 लाख 20 हजार रुपयांना फ्लॅटचा व्यवहार ठरला. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून चेक व रोख स्वरूपात 12 लाख रुपये घेतले. त्यानंतर फ्लॅटची फिर्यादी यांच्या नावावर न करता वसीम पाचूलाल पठाण व त्यांची पत्नी शबनम वसीम पठाण (रा. निगडी) यांच्या नावावर केला. फिर्यादी यांनी फ्लॅटसाठी दिलेले बारा लाख रुपये परत न करता आरोपींनी त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

Back to top button