सत्ता येत-जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही: राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र | पुढारी

सत्ता येत-जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही: राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांविरोधात कठोर कारवाईचा आदेश कोणी दिला, हे सर्वांना माहित आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहून नका, सत्ता येत जात असते सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन आलेला नाही, असे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांना  पाठले आहे.

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भोंग्याच्या मुद्यांवरुन पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहीले आहे. भोंग्यांच्या आंदोलनानंतर राज्याभरात पोलिसांकडून मन सैनिकांची सुरु असेलेल्या धरपकडीवर राज ठाकरे यांनी पत्राद्वारे खडसून टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी पत्रामध्ये पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. आम्हाला हैदराबादच्या ‘रझाकार’ प्रमाणे वागणूक दिली जात आहे. मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले आहे. अनेकांच्यावर वॉरंट जारी करुन त्यांची शोधमोहिम सुरु आहे. अनेकांना तडीपार केले गेले आहे. संदीप देशपांडेसह इतर कार्यकर्त्यांना पोलिस असे शोधत आहेत जणू ते पाकिस्तानातून दहशवादी आले आहेत. राज्य सरकार पोलिसी बळाचा वापर करुन दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा  आराेपही राज ठाकरे यांनी पत्राव्‍दारे केला आहे.

Back to top button