राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण | पुढारी

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण

पुढारी ऑनलाईन :
राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खासदार डॉ. फौजिया खान यांनी केली. डॉ. खान यांच्या हस्ते विद्या चव्हाण यांना नियुक्तपत्र देण्‍यात आले आहे. विद्या चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी जबाबदारी पार पडताना महिला संघटनेला अधिक बळकटी देतील, असा विश्वास फौजिया खान यांनी या वेळी व्यक्त केला.

या निवडीनंतर विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे की, देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. आम्ही यावर सातत्याने आवाज उठवणार आहोत.  रुपाली चाकणकर यांच्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपद खाली होतं. आता यावर माझी निवड झाली आहे, असंही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदाच महिला प्रदेशाध्यक्षपद आणि विभागवार अध्यक्षपद देण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button