मुंबई : एलआयसी आयपीओ आज होणार खुला | पुढारी

मुंबई : एलआयसी आयपीओ आज होणार खुला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
बहुप्रतीक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ बुधवारी खुला होणार आहे. देशातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी आयपीओसाठी बोली लावता येणार आहे. सामान्य गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी असल्याचे एलआयसीच्या अध्यक्ष एम. आर. कुमार यांनी सांगितले होते.

एलआयसीने आयपीओमधील काही भाग हा कर्मचारी, पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवला आहे. एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारकांना सवलतीच्या दरात बोली लावता येणार आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी सोमवारी आयपीओ खुला झाला होता. संस्थात्मक गुंतवणूकदारांना 5,627 कोटींची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांकडून 949 रुपये प्रतिशेअर या दराने बोली लावण्यात आली.

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्याची आरास.

हेही वाचलत का ?

Back to top button