Home Minister Dilip Walse-Patil
मुंबई
औरंगाबादमध्ये मनसे सभेवेळी अटींचे पालन केले जाईल अशी अपेक्षा : गृहमंत्री वळसे-पाटील
मुंबई, पुढारी वृत्तसेवा :
औरंगाबाद येथे होणाऱ्या मनसेच्या रॅलीसाठी काही अटी व शर्तींनी परवानगी देण्यात आली आहे. त्या अटींचे पालन केले जाईल, अशी आमची अपेक्षा आहे, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा होत आहे. यासाठी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, महाराष्ट्र पोलीस सतर्क आहेत. या सभेदरम्यान शांतता राखा, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे.

