देशातील सर्वात मोठा IPO आणण्याची मुकेश अंबानींची तयारी | पुढारी

देशातील सर्वात मोठा IPO आणण्याची मुकेश अंबानींची तयारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील सर्वात मोठी आयपीओ आणण्याची प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी तयारी केलेली आहे. जिओ आणि रिलायन्स रिटेलचा ५० ते ७५ हजार कोटींचा हा IPO असू शकतो. पुढील वर्षाच्या सर्वसाधारण सभेत त्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तसेच अमेरिकेतील शेअर बाजारातदेखील जिओची लिस्टिंगची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी रिलायन्स कंपनीचे बुधवारी शेअर बाजारामध्ये बाजार मूल्य हे १९ लाख कोटींपर्यंत गेले होते. इतकं मोठं बाजारमूल्य गाठणारी रिलायन्स ही कंपनी पहिलीच कंपनी ठरलेली आहे.

दुसरीकडे बाजारात IPO चा आयपीओ येत असताना यासंदर्भात मुकेश अंबानी मोठी शक्यता आहे, आगामी सर्वसाधारण सभेमध्ये रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिलेट व्हेंचर्स लिमिटेडचा मोठा आयपीओ आणण्याची तयार रिलायन्स कंपनीकडून केला जात आहे. जर का असला आयपीओ बाजारात आला तर बाजारात आजपर्यंतचा सर्वात मोठी आयपीओ ठरू शकतो, असं तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

पुढील आठवड्यातील एलआयसीचा आयपीओ बाजारात येत आहे, हा सर्वात आयपीओ ठरण्याची चर्चा असतानाच मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केलेली आहे. संबंधित माहिती हिंदू बिझनेस लाईन या कंपनीने एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. त्यातून ही माहिती समोर आलेली आहे.

Back to top button