

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा (University Exam) ऑफलाईनच होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली. या परीक्षा १ जून ते १५ जुलै या काळात घेतल्या जाणार आहेत.
मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सायंकाळी ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली की, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा (University Exam) या ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक पार पडली. यामध्ये सर्व कुलगुरुंनी ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम मत नोंदविले आहे. परीक्षा घेताना विद्यापीठ कडून विद्यार्थ्यांना प्रश्न संच दिले जातील. तसेच दोन पेपरमध्ये २ दिवसांचे अतंर असणार आहे. शिवाय या परीक्षा १ जून ते १५ जुलै दरम्यान घेतल्या जातील असे कुलगुरुंच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.