एका महिलेला ठाकरे सरकार घाबरलं अन् गुंड पाठवले : देवेंद्र फडणवीस | पुढारी

एका महिलेला ठाकरे सरकार घाबरलं अन् गुंड पाठवले : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : राणा दाम्‍पत्‍याने मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. एका महिलेला ठाकरे सरकार इतकं घाबरलं की, त्यांनी गुंड पाठवले, अशा शब्‍दात विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकार धारेवर धरले.

शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलं. त्यावर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. आता हनुमान चालीसा महाराष्ट्रात म्हटली जाणार नाही; मग पाकिस्तानात म्हटली जाणार का? एका महिलेला हे सरकार इतकं घाबरलं की गुंड पाठवण्यात आले. राज्यात झुंडशाहीचं सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी झुंडशाही सुरू आहे”, अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

“मुंबईत शनिवार ( दि. २३ ) मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे. झेड सिक्युरिटीमधील व्यक्ती तिथं येतात. ते सांगतात की, बाहेर ७०-८० गुंड आहेत. त्यांच्याकडून हल्ला केला जाऊ शकतो. तरीही पोलिसांच्या उपस्थितीतच झेड सिक्युरिटी असलेल्या व्यक्तीवर हल्ला होतो. एकतर पोलिसांच या हल्ल्याला समर्थन होतं किंवा  त्‍यांना दबावामुळे काहीच करता येत नाही”, असा आरोपही फडणवीसांनी केला.

 “कालच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा राज्यात कुणीही सुरक्षित नाही हे सिद्ध होईल. जर झेड सिक्युरिटी असलेल्या व्यक्तीला पोलीस सुरक्षित बाहेर काढू शकत नाहीत. पोलिसांसमोर दगड मारले जाणार असतील तर मग अशाप्रकराचं झुंडशाही सरकार मी पाहिलेलं नाही”, असेही ते म्‍हणाले.

पाहा व्हिडिओ : RRR ची स्टोरी ऐकुया कोल्हापूरच्या चौकातून | RRR story And Kolhapur

Back to top button