राणा दाम्पत्याला अटक, आजची रात्र खार पोलिस स्टेशनमध्ये जाणार | पुढारी

राणा दाम्पत्याला अटक, आजची रात्र खार पोलिस स्टेशनमध्ये जाणार

मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राणा दांपत्याला पोलिसांनी यशस्वीरित्या घराबाहेर काढले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात दोघांना खार पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तत्पूर्वी पोलिसांनी राणा दांपत्‍याला राहत्या घरातून ताब्‍यात घेतले. यावेळी घरामध्ये पोलिस आणि राणा दांपत्‍य यांच्यात खडाजंगी झाली. दोघांनी पोलिसांकडे वॉरंटची मागणी केली. अखेर 5.30 वाजलेनंतर पोलिसांना राणा दांपत्याला घराबाहेर काढण्यात यश आले. दरम्‍यान, रवि राणा बाहेर येताच घरासमोर जमलेल्या जमावातील एकाने त्यांच्यावर पाण्याची बाटली भिरकावली. घराबाहेर आल्यानंतर राणा दांपत्‍याने जय श्रीरामचा जयघोष केला. तर शिवसैकांनीही आक्रमक होत प्रतिआव्हान दिले.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली आली आहे. कलम १५३ (अ) अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. त्यामुळे दोघांना आजची रात्र पोलिस ठाण्यात घालवावी लागणार आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते आहे.

दरम्‍यान, शिवसैनिकांनी शांतता बाळगावी, पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना आंदोलन मागे घ्‍यावे असे आव्हान त्‍यांनी केले आहे. तसेच कायदा सुविधा बिघडू नये यासाठी काळजी घ्‍यावी असेही उध्दव ठाकरे म्‍हणाले.

शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यात राणा यांचेवर गुन्हा दाखल केला आहे, त्‍यानुसार पोलिस त्‍यांना चौकीत घेवून जातील. त्‍यामूळे शिवसैनिकांनी शांतता बाळगावी असे आवाहन त्‍यांना करण्यात आले आहे. त्‍यावेळी रवि राणा म्‍हणाले आमच्यावर गुन्हा दाखल करत असाल तर तो आम्‍हाला मान्य नाही. तुम्‍ही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करा. आमच्यावर दबाव आणला जातोय असे रवि राणा म्‍हणाले. तसेच वॉरंट शिवाय आम्‍ही कुठेही येणार नाही. असे राणा दांपत्‍य म्‍हणाले.

आज दुपारी आमदार रवी राणा यांनी मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यात विघ्न नको म्हणून ‘मातोश्री’ समोरील हनुमान चालिसा पठण आंदोलन मागे घेत आहोत, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा करत एकच जल्लोष केला. तसेच पेढे आणि साखर वाटण्यात आली.

२० फूट खाली गाडले जाल : संजय राऊत

अमरावतीचे बंटी-बबली मुंबईत आले होते. त्यांना शिवसेनेने पळवून लावले. आम्हाला धमक्या देऊ नका. अन्यथा २० फूट खाली गाडले जाल, असा  इशारा शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दिला.

राणा दांपत्याने मुंबईतील आंदोलन मागे घेण्याची  घोषणा केली. यानंतर पत्रकार परिषदेत संजय राऊत म्‍हणाले की, अमरावतीचे बंटी-बबली मुंबईत आले होते. त्यांना शिवसेनेने पळवून लावले. आम्हा धमक्या देऊ नका. अन्यथा २० फूट खाली गाडले जाल. आम्‍हाला हिंदुत्‍व काेणीही शिकवू नये. भाजपकडून अत्‍यंत हिन पातळीचे राजकारण सुरु आहे, असा आराेपही त्‍यांनी केला.

राणा दाम्पत्य हे पुढे केलेले प्यादे ; दिलीप वळसे-पाटील

राज्य सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा नियोजनबद्ध हा प्रयत्न आहे. राज्यात अस्थिरता, कायदा व सुव्यवस्था नसल्याचे भासवले जात आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पुढे केलेले नुसते प्यादे आहे. केवळ प्रसिद्धीसाठी राणा दाम्पत्यांचा हा स्टंट सुरू आहे. कायद्याच्या विरोधात राणा दाम्पत्यांनी वर्तन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

राणा माफी मागत मागावी : अनिल परब

जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत शिवसैनिक हलणार नाहीत, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमचे शिवसैनिक गदाधारी आहेत. मातोश्री आमचं दैवत आहे. त्याकडे वाकडी नजर करून बघू नये, असा इशाराही त्‍यांनी यावेळी दिला. दरम्यान, राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार येथील आपल्या निवासस्थानी आहेत. राणांच्या घरांसमोरही शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.

हेही वाचा  

Back to top button