‘राणा दाम्पत्यांनी दिल्लीत जाऊन हनुमान चालिसा पठण करावे’
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीत जाऊन हनुमान चालिसा पठण करा, असे आव्हान शिवसेना नेते अनिल देसाई यांनी आज राणा दाम्पत्यांना दिले. एवढी नैसर्गिक संकटे आली, कोरोनाचं संकट आले त्यावेळी हनुमान चालिसा का आठवली नाही ? असा सवालही त्यांनी केला.
माताेश्री बंगल्या बाहेर माध्यमांशी बाेलताना अनिल देसाई म्हणाले, " कोणीतरी भडकावल्यानंतर तुम्ही जागे होता. नवहिंदू म्हणून स्वत:ला सांगता. राणा दाम्पत्य हा फक्त चेहरा आहे, मात्र प्रत्यक्षात भूमिका कोणाची दुसऱ्याचीच आहे. हिंदूत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे. शिवसेनेला हिंदूत्व शिकवण्याची काहीच गरज नाही. राणा दाम्पत्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक सज्ज आहेत".
आंदोलनाचा कायदा व सुव्यवस्थेवर काय परिणाम होईल यावर बोलत असताना ते म्हणाले की, या आंदोलनाचा नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी पोलीस घेत आहेत. कायदा आणि सुवव्यवस्थेचं काम सुरु आहे.
राणा दाम्पत्यांनी मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाचा विरोध करत शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतली आहे. राणा दाम्पत्यांच्या बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी गर्दी केली. राणांनी खाली उतरावं, प्रसाद घेऊनच जावं, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
हेही वाचा

