coal crisis : महाराष्ट्रातील कोळसा टंचाईवर ‘कोळसा मंत्रालया’चा खुलासा

Coal stock : कोल इंडियाकडे ४०० लाख टन कोळसा साठा, कोळसा मंत्रालयाचे स्पष्टीकरण
Coal stock : कोल इंडियाकडे ४०० लाख टन कोळसा साठा, कोळसा मंत्रालयाचे स्पष्टीकरण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐन उन्हाळ्यात कोळसा टंचाईमुळे महाराष्ट्रात वीजटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. सुमारे तीन हजार मेगावॅट विजेची तूट आहे. त्यामुळे राज्य सरकारने भारनियमन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारला सध्या मार्च महिन्याच्या तुलनेत अधिक कोळसा पुरवठा केला जात असल्याचे कोळसा मंत्रालयाने (coal crisis)  स्पष्ट केले आहे.

काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्ताला उत्तर देताना मंत्रालयाने  (coal crisis)  सांगितले की, सद्यस्थितीत राज्य त्यांची कोळशाची गरज भागवत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना (टीपीपी) 70.77 दशलक्ष टन (एमटी ) कोळशाचा पुरवठा करण्यात आला. विजेच्या मागणीत होत असलेल्या वाढीनुसार औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा वाढवला जात आहे.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मध्ये, महाराष्ट्रातील वीज प्रकल्पांना दररोज 2.14 लाख टन कोळशाचा पुरवठा होत होता. हा कोळसा पुरवठा एप्रिल महिन्यात 11.04.2022 पर्यंत दररोज 2.76 लाख टन पर्यंत वाढला आहे.

महाजेनकोला 2021-22 मध्ये 37.131 मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा करण्यात आला आहे. महाजेनकोला मार्च – 22 मध्ये होणारा दैनंदिन कोळसा पुरवठा 0.96 लाख टन प्रतिदिन होता. जो एप्रिलमध्ये (11.04.22 पर्यंत) 1.32 लाख टन प्रतिदिन झाला आहे. महाजेनकोकडे सुमारे 2390 कोटी रुपयांची थकबाकी असतानाही महाराष्ट्राची कोळशाची गरज भागवली जात आहे, हेही तितकेच समर्पक आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news