राज ठाकरेंच्‍या दाैर्‍याबाबत आदित्‍य ठाकरे म्‍हणाले “औरंगाबादमध्‍ये आम्‍ही…” | पुढारी

राज ठाकरेंच्‍या दाैर्‍याबाबत आदित्‍य ठाकरे म्‍हणाले "औरंगाबादमध्‍ये आम्‍ही..."

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : आम्ही काल हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालिसाचे पठण केले; पण याचे आम्ही राजकारण केले नाही.  राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा घेत वारंवार औरंगाबाद दौरा करत आहेत. आम्ही औरंगाबादमध्ये पर्यटनावर भर देत आहोत. ते पर्यटनासाठी जात असतील, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

मुंबई येथील भारतेश्वरला दुसऱ्या वेव्हिंग डेकच्या उदघाटनासाठी आलेल्‍या आदित्‍य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, ” भारतेश्वरला दुसऱ्या वेव्हिंग डेकचे उदघाटन करण्यात आले आहे. हे उदघाटन निवडणुका तोंडावर असल्याने आम्ही करत नाही आम्ही पाच वर्षे विकासकामे करत असतो. मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधी आहेत याबाबत मलाही कल्पना नाही आम्ही विकासकामे पाच वर्षे करताे”.

अयोध्याचा संघर्ष होता त्यावेळी आम्ही जात होतो. राम मंदिरासाठी आम्ही लढलो. सध्या न्‍यायालयाने राम मंदिराचा निर्णय दिला आहे. यावर राजकारण करणे कितपत योग्य आहे. आम्ही शनिवारी हनुमान जयंती निमित्त हनुमान चालिसा पठण केले; पण याचे आम्ही राजकारण केले नाही, असेही ते म्‍हणाले. राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा घेत वारंवार औरंगाबाद दौरा करत आहेत यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही औरंगाबादमध्ये पर्यटनावर भर देत आहोत यासाठी ते जात असतील.

हेही वाचा :

Back to top button