हसन मुश्रीफांच्या कुटुंबियावरील कारवाईसाठी पाठपुरावा सुरू : किरीट सोमय्या

किरीट सोमय्या
किरीट सोमय्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी १५८ कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी मंत्री मुश्रीफ यांचा मुलगा, जावई आणि इतर ७ जणांविरुद्ध पोलीस एफआयआर नोंदवून चौकशी, कारवाई करतील, अशी अपेक्षा सोमय्या यांनी ट्विट करून व्यक्त केली आहे.

या प्रकरणी ईडी आणि आयकर विभागाने कठोर कारवाई करावी, यासाठी मी पाठपुरावा करत आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची १०० कोटींपेक्षा अधिक संपत्ती बेनामी असून त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे. हसन मुश्रीफ यांची बेनामी संपत्ती जप्त करा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. ठाकरे, पवार कारवाई करणार नाहीत. ते स्वतःच घोटाळेबाज आहेत. त्यामुळे एक घोटाळेबाज दुसर्‍या घोटाळेबाजाला मदत करत असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. पुण्यात प्राप्तिकर सदनमध्ये शुक्रवारी (दि.1) दुपारी सोमय्या आले होते. मुश्रीफ यांच्या विरोधात प्राप्तिकर विभागाकडे केलेल्या तक्रारीचे काय झाले, याची विचारणा करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले होते.

सोमय्या म्हणाले, हे पैसे कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे. हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे. त्यांची पवार, ठाकरे यांनी का चौकशी केली नाही? केंद्र सरकारच्या कंपनी मंत्रालयाने अधिकृत फौजदारी प्रक्रियेची याचिका दाखल केली आहे. एक एक मंत्री घोटाळ्यात सापडत आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ, संजय राऊत व अजित पवार ही सगळीच नावे घोटाळ्यातील आहेत. हे घोटाळे सिद्ध होत आहेत. तरीही मुख्यमंत्री म्हणून ठाकरे काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यांनी आता बोलणे बंद करून कारवाई करायला हवी.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news