राजेश टोपे : 'गुढीपाडवा शोभायात्रांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील' | पुढारी

राजेश टोपे : 'गुढीपाडवा शोभायात्रांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील'

पुढारी ऑनलाईन डेस्क : परदेशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने धोका वाढलेला आहे. परंतु आपल्याकडे अद्याप परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तरीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल. गुडीपाडव्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गुरूवारी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतील. शोभायात्रांबद्दल सकारात्मक निर्णय घेतला जाईल, नियम पाळून सण साजरे करण्यास परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री टोपे म्हणाले की, राज्यात निर्बंध संपुष्टात आणण्याचा विचार आहे. १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी लस घ्यावी, म्हणून निर्बंध कायम ठेवले आहेत. लसीकरणाचे लक्ष्य गाठण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्याच्या टास्क फोर्ससोबत चर्चा करून रेल्वे, मॉल, बसमधील शिथिलीकरण करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. लसीकरण वाढण्याविण्यासाठी रेल्वेमधील निर्बंध कायम ठेवले आहेत. तरी सर्वांनी कोरोना लस घ्यावी, असे आवाहन टोपे यांनी यावेळी केले.

सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा. मास्कमुक्तीचा सध्या तरी विचार केलेला नाही. मास्कमुक्तीचे धारिष्ट तूर्तास करणे योग्य ठरणार नाही. सणवार साजरे करताना काळजी घ्या, निर्बंध हळूहळू शिथील केले जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यास परवानगी दिली जाईल. नियम पाळून सण साजरे करण्यास परवानगी असेल. गुढीपाडव्याच्या मिरवणुकांबाबत परवानगी देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे गुरूवारी चर्चा करून घेतील. मुख्यमंत्री जनेतच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतील, असे टोपे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button