महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्सझेंडर टॉयलेटचें गोरेगावात उद्घाटन : तृतीयपंथीना दिलासा

महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्सझेंडर टॉयलेटचें गोरेगावात उद्घाटन : तृतीयपंथीना दिलासा
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई येथे पहिल्या ट्रान्सझेंडर टॉयलेटचें उद्घाटन होणार आहे. मुंबईतील जोगेश्वरी विधानसभा परिसरातील गोरेगाव पूर्वेला बुधवारी सायंकाळी होणार आहे. गोरेगाव आरे नाका येथील महापालिकेच्या शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात तृतीयपंथीयासाठी हे पहिले मुंबईतील शौचालय आहे.

दरम्‍यान, अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांसाठी शौचालयाची मागणी विविध स्तरावर करण्यात येत होती. मात्र कोणाकडूनच पुढाकार किंवा प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर सारथी फाऊंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष ऍड. पवन यादव यांनी आमदार रविंद्र वायकर यांना तृतीयपंथीच्या बाबत माहिती देत याबाबत पत्र दिले.

या पत्रानंतर तृतीयपंथीची मागणी मान्य करून शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात शौचालयाचे काम आमदार फंडातून करून बांधण्यात आले. गोरेगाव चेकनाका याठिकाणी अनेक तृतीयपंथी सिग्नलवर उभे असतात. तसेच अनेक तृतीय पंथी या विभागात राहण्यासाठी असल्यामुळे अशा तृतीयपंथी यांना याचा लाभ होईल. असे पवन यादव म्‍हणाले.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news