'मातोश्री'ला वाचविण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते : किरीट सोमय्या | पुढारी

'मातोश्री'ला वाचविण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते : किरीट सोमय्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या सापडलेल्या डायरीत मातोश्रीला २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या मातोश्री कोण याची चर्चा सुरु झाली आहे. आता यावरून भाजप नेते किरीट सोमय्या  (Kirit Somaiya) यांनी ट्विट करून जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.

यशवंत जाधव यांनी घोटाळा लपविण्यासाठी वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वतःच्या आईचे नांव द्यावे, हे वाईट वाटते. ५० लाखांचे घड्याळ, २ कोटी रोख दिले. जाधवांनी पोच पावती, बिलही घेतले असेल?, असे ट्विट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले आहे.
दरम्यान, यशवंत जाधव यांनी मातोश्री म्हणजेच आई म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव मातोश्री आहे. या व्यवहाराबाबत आयकर विभागाला संशय असल्याने तपास सुरु केला आहे. आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांवरुन प्राप्तीकर विभागाने यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या डायरीमध्ये त्यांनी केलेल्या व्यवहारांची नोंदी आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आता यावरून विरोधकांनी आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button