IPL Team Bus : मनसेने फोडली आयपीएल खेळाडूंची बस, स्थानिकांना डावलल्याने खळ्ळफट्ट्याक आंदोलन | पुढारी

IPL Team Bus : मनसेने फोडली आयपीएल खेळाडूंची बस, स्थानिकांना डावलल्याने खळ्ळफट्ट्याक आंदोलन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कुलाबा येथील हॉटेल ताजच्या मागील गल्लीत पार्क असलेली आयपीएल खेळाडूंसाठी (IPL Team Bus) वापरण्यात येणारी प्रवासी बस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री उशीरा फोडली.

IPL Team Bus – स्थानिकांना डावलल्याने खळ्ळफट्ट्याक आंदोलन

खेळाडूंसाठी प्रवासी वाहतूक पुरवण्याचे काम स्थानिक वाहतुकदारांना देण्याची मागणी यापूर्वीच मनसेने आयपीएल प्रशासनाकडे केली होती. मात्र तरीही परप्रांतीय वाहतुकदारांना हे काम दिल्याने खळ्ळफट्ट्याक आंदोलन केल्याची माहिती वाहतूक सेेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे. तसेच यापुढेही स्थानिकांना डावलून परप्रांतियांना रोजगार दिल्यास आयपीएलचे सामने (IPL Team Bus) महाराष्ट्रातून उधळून लावण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button