पुतीन यांची वेडा माणूस म्हणून खिल्ली उडवणार्‍या रशियन मॉडेलची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये सापडला | पुढारी

पुतीन यांची वेडा माणूस म्हणून खिल्ली उडवणार्‍या रशियन मॉडेलची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये सापडला

मॉस्को; वृत्तसंस्था : रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना वेडा माणूस म्हणून खिल्ली उडवणारी रशियन मॉडेल ग्रेटा वेडलेर हिची हत्या झाल्याचे समोर आले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, वेडलेर हिची हत्या केल्याचा गुन्हा तिच्या माजी प्रियकराने मान्य केला आहे. प्रकरणाची पोलिस चौकशी सुरू आहे. 23 वर्षीय मॉडेल वेडलेरने जानेवारी 2022 मध्ये फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये तिने पुतीन मनोरग्ण आणि महत्त्वाकांक्षी असून, त्यांच्यासारखे लोक लहानपणापासूनच भित्रे असतात. अंधार आणि आवाजाला ते घाबरतात.

रशियाच्या अखंडतेचे भूत पुतीन यांच्या मानेवर बसले असून, त्यातून केवळ दुःख आणि अश्रूच मिळणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटले होते. वेडलेर हिच्या हत्येच्या संशयावरून तिचा माजी प्रियकर दिमित्री कोरोव्हिन याला पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक व्यवहारातून वेडलेर हिची हत्या केल्याचे कोरोव्हिन याने सांगितले आहे. दरम्यान, पोलिस अन्य कारणांचाही शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा :

Back to top button