मनुकुमार श्रीवास्तव राज्याचे नवे मुख्य सचिव | पुढारी

मनुकुमार श्रीवास्तव राज्याचे नवे मुख्य सचिव

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मनुकुमार श्रीवास्तव यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती आज निवृत्त होत आहेत. या पदासाठी अतिरिक्‍त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (गृह), सुजाता सौनिक (सेवा), मनोज सौनिक (अर्थ) आणि नितीन करीर (महसूल) हे चार जण शर्यतीत आहेत. अखेर मनुकुमार श्रीवास्तव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

श्रीवास्तव 1986 च्या बॅचचे असून, ते सर्वात अनुभवी अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची या पदावर त्यांची वर्णी लागली. 1986 च्या आयएएस बॅचचे चक्रवर्ती यांना 30 नोव्हेंबर 2021 रोजी तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या निवृत्तीनंतर या पदाचा अतिरिक्‍त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर महिनाभराने चक्रवर्ती यांना पूर्वलक्षी प्रभावाने मुख्य सचिव पदी नेमण्यात आले. राज्याच्या प्रशासकीय विभागाच्या इतिहासात पूर्वलक्षी प्रभावाने नेमण्यात आलेली ही एकमेव नियुक्‍ती होती.

दरम्यान, चक्रवर्ती यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, सीताराम कुंटे आणि संजय कुमार वगळता यापूर्वीच्या मुख्य सचिवांना तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

मुख्य सचिवपदाचा विचार करताना याआधी अनेकदा त्याची सेवाज्येष्ठता लक्षात न घेता तडफदार अधिकारी नियुक्‍त करण्याकडे मुख्यमंत्र्यांचा कल राहिला आहे. त्यामुळे यावेळी कुणाची वर्णी लागते हे सांगता येणार नाही, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले होते. मात्र, हा अंदाज यावेळी फोल ठरला असून मनुकुमार श्रीवास्तव यांची नियु्क्ती झाली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button