College accreditation issues : राज्यात पात्र विद्यार्थी, प्राध्यापकांविना तब्बल १२३ बोगस महाविद्यालये

राज्य सरकारची विधान परिषदेत धक्कादायक माहिती
College accreditation issues
College accreditation issuespudhari photo
Published on
Updated on

मुंबई : महाविद्यालय चालवण्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या, पात्र प्राध्यापक, प्रयोगशाळा आणि ग्रंथालये नसलेली राज्यात तब्बल १२३ महाविद्यालये सुरू आहेत, अशी धक्कादायक माहिती विधान परिषदेत लेखी उत्तरात सरकारने दिली आहे. भाजपा विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरात ही माहीती देण्यात आली आहे.

राज्यातील विविध विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा नाहीत. या महाविद्यालयांनी शासन निर्णयांच्या निकषांची पूर्तता केलेली नाही. याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले. यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, कायद्यानुसार अनिवार्य निकष पूर्ण न करणार्‍या राज्यातील महाविद्यालयांची यादीच सादर केली.

College accreditation issues
FYJC Second Merit List: अकरावीच्या प्रवेशाची पुन्हा हुकली संधी; दुसऱ्या यादीत कटऑफमध्ये वाढ

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०८ अन्वये संलग्नीकरण आणि मान्यतेसाठी अटी-शर्ती विहित करण्यात आल्या आहेत. तसेच कलम ११७ अन्वये महाविद्यालयाचे व मान्यताप्राप्त परिसंस्था यांची तपासणी व अहवालाबाबत आणि कलम १२० अन्वने संलग्नता आणि मान्यता काढून घेण्याबाबत तरतूद आहे. यानुसार अनिवार्य निकषांची पूर्तता करीत नसलेल्या महाविद्यालयांबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहीती त्यांनी लेखी उत्तरात दिली.

२०२५-२६ मधील बोगस महाविद्यालये

  • कोकण विभाग -२

  • अमरावती विभाग- २०

  • पुणे विभाग- ३

  • नागपूर विभाग -१२

  • नाशिक विभाग- ५

  • छत्रपती संभाजीनगर -८१

  • एकूण -१२३

College accreditation issues
Shivaji University | अधिविभाग, संलग्न महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांच्या जागा यंदाही रिक्तच!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news