डोंबिवली : प्रभाग रचनेनंतर भाजपची तत्काळ बैठक | पुढारी

डोंबिवली : प्रभाग रचनेनंतर भाजपची तत्काळ बैठक

डोंबिवली, पुढारी वृत्‍तसेवा :  महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी प्रभाग रचना करण्यात आल्या आहेत. १२२ नगरसेवकांच्या जागेसाठी केवळ 44 प्रभाग पाडण्यात आले आहेत. ही निवडणूक बहुसदस्य पद्धतीने होणार असून पडलेले प्रभाग मान्य नसल्याने डोंबिवली पूर्व मंडळ कार्यालय येथे भाजपचे माजी नगरसेवक आणि आमदार रवींद्र चव्हाण यांची बैठक पार पडली. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी कल्याण येथील भाजपच्या नगरसेवकांची देखील यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तसेच, यावेळी ही प्रभग रचना मान्यच नसल्याचे सांगत या प्रभाग रचनांवर आज रात्रीपर्यंत पूर्ण अभ्यास करणार असून त्यानंतर हरकती नोंदवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाजपला टक्कर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांना किती प्रयत्न करावे लागतात असे उद्गार आमदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी काढले. तर नगरसेवक राहत असलेल्या ठिकाणापासून ८ किलो मिटरचा परिसर दिल्याने नगरसेवकाना नागरिकांशी संवाद साधणं कठीण होणार असून नागरिकांना देखील त्यांच्या समस्या सांगण्यासाठी ८ किलो मिटर दूर यावे लागेल अशी खंत नितीन पाटील यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे डोंबिवली पूर्व येथे भाजपचा पगडा असून मागील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकूण ४८ नगरसेवक भाजपचे होते. आता सेना भाजप वेगळे लढणार असून यामध्ये मनसे देखील या पक्षांना टक्कर देईल अशी चर्चा आहे. त्यामुळे एकंदरीतच निवडणुकीला कशी चुरस रंगते हे काळच ठरवेल.

हे ही वाचलं का 

Back to top button