Nitish Bharadwaj : नितीश भारद्वाज यांचा लग्नाच्या १२ वर्षानंतर पत्नी स्मिता सोबत घेतला घटस्फोट | पुढारी

Nitish Bharadwaj : नितीश भारद्वाज यांचा लग्नाच्या १२ वर्षानंतर पत्नी स्मिता सोबत घेतला घटस्फोट

पुढारी ऑनलाईन डेस्क

टेलिव्हिजनवरील ऐतिहासिक मालिका ‘महाभारत’मध्ये कृष्णाची भूमिका साकारलेले कलाकार नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांनी लग्नाच्या 12 वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे. नितीश आणि त्यांची पत्नी स्मिता यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला होता. नितीश यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्यामध्ये झालेल्या घटस्फोटाबद्दल खुलासा केला होता.

काय होतं घटस्फोटाचे कारण?

मुलाखतीमध्ये यांना घटस्फोटाबद्दल विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी सांगितले की, होय आम्ही 2019 मध्येच घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आमचे विभक्त होण्याचे कारण काय होते? मला इतक्या खोलात जायचे नाही. आमचा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे. घटस्फोटाबद्दल मी एवढेच म्हणेन की घटस्फोट मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक आहे.

लग्नाच्या बंधनावर नितीश काय म्हणाले

लग्नाच्या पवित्र बंधनावर नितीश म्हणाले, “माझा लग्नावर विश्वास आहे, पण माझ्या या नात्यात मी भाग्यवान नाही. मला वाटतं लग्न तुटण्यामागे अनेक कारणं असू शकतात. अनेकवेळा आपण आपल्या जोडीदाराच्या वागण्याशी जुळवून घेऊ शकत नाही. आपल्याला जमत नसेल तर अनेकवेळा एकमेकांसाठी संकुचितपणाचा अभाव असतो. आपला अहंकार आणि भिन्न वृत्ती सुद्धा कधीकधी नात्याच्या आड येतात. हे नातं तुटल्यावर दोघांसाठी हे खूप वेदनादायी असतं तसेच ते मुलांनाही त्रासदायक ठरतं. “

पत्नी आयएएस अधिकारी…

नितीश भारद्वाज यांच्या पत्नीचे नाव स्मिता आहे. त्या आयएएस अधिकारी आहेत. नितीश आणि स्मिता यांना दोन मुली आहेत. दोन्ही मुली  स्मितासोबत इंदूरला राहतात.

नितीश आपल्या मुलींना भेटल्यावर काय म्हणाले?

जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आले की तुम्ही तुमच्या मुलींशी संवाद साधू शकता का, तेव्हा त्यांनी उत्तर देणे टाळले आणि याबाबत मला काहीही बोलायचे नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा

Back to top button