MPSC Paper Leak Row: पेपरफुटीविरोधातील आंदोलन चिघळले; MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं, संभाजी ब्रिगेडचा इशारा

MPSC paper leak Sambhaji Brigade Mahendra Harpalkar: MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीच्या आरोपावरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलं आहे.
MPSC paper leak Sambhaji Brigade Mahendra Harpalkar
MPSC paper leak Sambhaji Brigade Mahendra HarpalkarPudhari
Published on
Updated on

MPSC paper leak Sambhaji Brigade Mahendra Harpalkar: MPSC औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीच्या आरोपांवरून महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासल्याचा दावा संघटनेने केला आहे. या घटनेनंतर MPSC प्रशासन आणि सरकारविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते ॲड. संतोष शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज दादा आखरे यांनी 3 ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान सरकारला याबाबत इशारा दिला होता. MPSC औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन केले होते.

‘सरकारला इशारा दिला होता’

या आंदोलनावेळी सरकारने पेपरफुटीच्या प्रकरणात ठोस कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता, असा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. मात्र, सरकारकडून अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप करत संघटनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

संभाजी ब्रिगेडने या कारवाईला भ्रष्ट व्यवस्थेविरोधातील प्रतीकात्मक निषेध असल्याचे म्हटले आहे. MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकार आणि आयोग गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोपही संघटनेने केला.

MPSC paper leak Sambhaji Brigade Mahendra Harpalkar
Bhandara Accident Video: भंडाऱ्यात काळीज पिळवटून टाकणारा अपघात! चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू; अपघातापूर्वीचा CCTV व्हिडिओ समोर

‘पुढचा नंबर MPSC अध्यक्षांचा’

MPSCचे अध्यक्ष आणि सचिव यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. MPSCचे अध्यक्ष आणि सचिव यांनी तत्काळ राजीनामा दिला नाही, तर पुढील आंदोलन MPSC अध्यक्षांविरोधात केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

दरम्यान, MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत आणि मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी असल्याचे ॲड. संतोष शिंदे यांनी सांगितले.

MPSC paper leak Sambhaji Brigade Mahendra Harpalkar
Haiwaan Movie Review: अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा 'हैवान' प्रदर्शित; जाणून घ्या कसा आहे चित्रपट

विद्यार्थ्यांमध्ये असंतोष

MPSCच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राहावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. पेपरफुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन सरकार आणि MPSCने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

दरम्यान, सचिवांच्या तोंडाला काळं फासल्याच्या घटनेमुळे या आंदोलनाला आता वेगळे वळण मिळाले असून, आगामी काळात प्रशासनाकडून यावर कोणती कारवाई केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news