हिंगोली: फिरत्या एक्स-रे व्हॅनच्या माध्यमातून होणार क्षय रुग्णांची तपासणी

फिरत्या एक्स-रे
फिरत्या एक्स-रे

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा ः राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात फिरत्या एक्स- रे व्हॅनच्या माध्यमातून संशयित क्षय रुग्णांची एक्स रे तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जी.एस. मिरदुडे, डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रशांत तुपकरी, ज्ञानेश्‍वर चौधरी, डॉ. गणेश जोगदंड यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. ही मोहिम 12 जुलैपर्यंत राबविली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news