परभणी, पुढारी वृत्तसेवा :ड्रायव्हिंग स्कूलच्या नूतनीकरणासाठी 40 हजारांची लाच स्वीकारणार्या आरटीओतील कनिष्ठ लिपिकाला गुरुवारी पकडण्यात आले. पुणे येथील एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला ड्रायव्हिंग स्कूलच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करावयाचा होता. या कामासाठी कनिष्ठ लिपिक अल्ताफ पठाण याने 40 हजार रुपये मागितले. या नंतर तक्रारदाराने पुणे येथील एसबीकडे तक्रार केली. पुण्याच्या पथकाने परभणीत दुपारी चार वाजता पठाण यास लाच घेताना पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक भारत साळुंके, वराडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचलंत का?