औरंगाबाद : नाथसागर धरणात ७८.१४ टक्के पाणीसाठा; १ हजार ५ ८९ क्युसेक पाण्याचा विसर्ग

नाथसागर धरण
नाथसागर धरण

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये मंगळवारी (दि.19) सायंकाळी सहा वाजता ५१ हजार ७२१ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. सध्या पाणी पातळी १५१७.७३ फूट असून जलविद्युत केंद्रातून १ हजार ५८९ क्युसेक पाण्याची विसर्ग गोदावरी नदीत सुरू केला आहे. असे निर्णय पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी याबाबत माहिती दिली.

नाथसागर धरणाच्या वरील भागातून दिवसभर कमी अधिक मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळी सहाच्या दरम्‍यान नोंद केल्यानुसार धरणातून ५१ हजार ७२१ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे धरणाची पाणी पातळी १५१७.७३ फूट पर्यंत पोहोचली आहे. आता पाण्याची ७८.१४ टक्केवारी नोंद झाली.

सध्या धरण्यात एकूण पाणीसाठा १६९६. ४७३ दलघमी उपलब्ध असल्यामुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण उपअभियंता अशोक चव्हाण, शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खराडकर यांनी धरणाच्या दरवाजा न उघडता जलविद्युत केंद्रातून गोदावरी नदीमध्ये १ हजार ५८९ क्युसेक पाण्याची विसर्ग सुरू केला. नाथसागर धरणाच्या वरील भागातून रात्री व उद्या सकाळी अशाच पद्धतीने पाण्याची आवक मिळत राहिल्यास धरणाच्या २७ दरवाजा पैकी काही दरवाजे थोड्या प्रमाणावर उघडल्या जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी माहिती दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news