केज-बीड रोडवर पिकअप – कारचा भीषण अपघात; एकजण ठार

केज-बीड रोडवर पिकअप – कारचा भीषण अपघात; एकजण ठार
Published on
Updated on

केज; पुढारी वत्तसेवा : केज-बीड महामार्गावर सारुळ फाट्यावर झालेल्या पिकअप आणि कारच्या अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू झाला. या बाबतची अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ९:३० च्या दरम्यान महेश बहादूर पुरी (वय २५ ) हा पिकअप क्र. (एम एच २३/ एच ९०३०) चालवीत सारुळ कडून केज-बीड या महामार्गाने नांदूर फाट्याकडे जाताना त्याला बीडकडून धारूरकडे जात वेगाने येणाऱ्या कारने क्र. (एम एच २५/आर ७०१२) ने जोराची धडक दिली.

या धडकेत पिकअप रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यात पिकअप चालक महेश बहादूर पुरी वय (वय २५ ) याच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघातानंतर त्याला खाजगी वाहनाने बीडकडे दवाखाण्यात घेऊन जात असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना समजताच त्यांच्या सूचनेनुसार पोलीस नाईक अशोक मेसे, शेख रशीद आणि हनुमंत गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले.

दोन वर्षात वेगवेगळ्या अपघातात बाप-लेकाचा याच रस्त्यावर बळी !

दि.२२ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ३:०० वा च्या दरम्यान महेंद्रा एक्सयुव्ही कार व मोटारसायकल मध्ये झालेल्या अपघातात नामदेव ढाकणे, आप्पाराव बापूराव ढाकणे वय (८० वर्ष), सुंदर नामदेव ढाकणे वय (५३ वर्ष) आणि बहादूर राजाभाऊ पुरी (वय ४८) (सर्व रा. सारुळ) या तिघांचा मृत्यू झाला होता.यात महेश पुरी याचे वडील बहादूर पुरी यांचाही समावेश होता.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news